ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युवा संदेश प्रतिष्ठानच्या सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

October 4, 202113:10 PM 93 0 0

बांदा /सिंधुदुर्ग प्रतिनिधी (सौ.स्वाती पाटील ) युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंच सर्च STS २०२०चा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०.३० वा मातोश्री मंगल कार्यालय कणकवली येथे सिंधुदुर्ग जि .प. अध्यक्षा संजना संदेश सावंत,दै पुढारी आवृत्ती प्रमुख गणेश जेठे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, कणकवली सभापती मनोज रावराणे, शिक्षकनेते भाई चव्हाण,श्री निलेश सामंत आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे यांच्यावतीने ९ फेब्रुवारी २०२० रोजी सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS-2020 परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेत ५४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. या परीक्षेचा निकाल एप्रिल २०२० मध्ये जाहीर करण्यात आला होता मात्र कोवीड १९ प्रादुर्भावामुळे बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला नव्हता.


या बक्षीसवितरण समारंभात ३री, ४थी, ६वी व ७ वी मधील सुमारे २०० गुणवंत विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची रोख बक्षिसे, सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.प्रत्येक इयत्तेतील जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झालेल्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांना अनुक्रमे २५००,२०००,१७००,१५००,१२००रुपये रोख तसेच आठही तालुक्यातील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना अनुक्रमे १०००,७००,५००,५००,५०० रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, देऊन गौरविण्यात आले त्याचप्रमाणे ६वी व ७वी मधील जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवललेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार २०२०-२१ चे वितरण करण्यात आले श्री आनंद मानाजी तांबे जि. प .शाळा ओटव नांदगाव आणि श्रीम वंदना नारायण राणे, जि .प. शाळा कणकवली क्र .२ यांना शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मनातील स्पर्धा परीक्षेची भिती कमी व्हावी ,शिष्यवृत्ती परीक्षेची व UPSC, MPSC परीक्षेची तयारी व्हावी .भविष्यात ग्रामीण होतकरू विद्यार्थी सरकारी अधिकारी व्हावेत या पवित्र हेतुने सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेची सुरुवात करण्यात आली. ३री, ४थी, ६वी व ७ वी या वर्गासाठी सेमी व मराठी माध्यमातून या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. युवा संदेश प्रतिष्ठान अभ्यास मंडळातील जिल्हातील व जिल्हयाबाहेरील तज्ञ शिक्षकांमार्फत स्वतंत्र अभ्यासक्रम पुस्तिकेची निर्मीती करण्यात येते. यावर्षी STS परीक्षा रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आली असून या परीक्षेसाठी प्रत्येक तालुक्यात परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ही परीक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रावर होणार असून अधिक माहिती साठी श्री सुशांत मर्गज, परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च(९४२०२०६३२६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश सावंत यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *