ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारत बंदच्या पाठिंब्यासाठी उरण मध्ये मिरवणूक

September 28, 202114:46 PM 3 0 0

उरण (संगिता पवार ) सरकारच्या कृषी विषयक तीन कायद्यांविरोधात मागील दहा महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लढत असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला पाठिंबा देण्यासाठी उरण मध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष,काँग्रेस व शेतकरी कामगार पक्ष यांच्या पक्षाने यामध्ये सहभाग घेतला होता.


यावेळी महागाई,बेरोजगारी वाढविणारे मोदी सरकार चले जावं,शेतकरी विरोधी कायदे रद्द करा,कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या नवीन कामगार सहिता मागे घ्या. महागाई कमी करा,आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. हे सरकार जातीवादी व भांडवलदार धार्जिणे असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली. जेएनपीटीचे कामगार विश्वत कॉम्रेड भूषण पाटील यांनीही कामगारांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार शक्ती मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड संजय ठाकूर, त्याच प्रमाणे शेकापच्या सीमा घरत,जनवादी महिला संघटनेच्या सचिव अमिता ठाकूर,सीआयटीयुचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधुसूदन म्हात्रे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *