ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठा समन्वय परिषदेच्या महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी प्रा. अनिता काळे यांची नियुक्ती

August 22, 202213:08 PM 12 0 0

अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणार्‍या उपक्रमशील शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांची मराठा समन्वय परिषदेच्या राज्याच्या मुख्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ शारदा जाधव, राष्ट्रीय महासचिव सीए विजय कुमार शिंदे यांच्या कार्यसमितीने शिवमती अनिता काळे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
अनिता काळे या जिल्हा परिषदेच्या शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात गत दोन दशकापेक्षा जास्त काळापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात जिजाऊ ब्रिगेडच्या बांधणीत काळे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महिलाशक्ती संघटित करण्याच्या कामात जिल्ह्यात काळे यांचा लौकिक असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर काम करण्याची संधी देण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील यांनी म्हंटले आहे.

मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून सामाजिक योगदान देऊन, महिला, युवक व युवतींच्या प्रश्‍नांसाठी विशेष कार्य करणार असल्याची भावना काळे यांनी व्यक्त केली. या नियुक्तीबद्दल मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, प्रयास ग्रुप व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्हा परिषद शिक्षकांनी काळे यांचे अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *