ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शहरातील मुलभुत सुविधांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावाः अशोक पांगारकर

September 9, 202122:49 PM 46 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील पाणी प्रश्‍नासह मुलभुत समस्या आणि प्रलंबित असलेल्या विकासांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात यावी अशी मागणी भाजपाचे गटनेते अशोक (लक्ष्मीकांत) पांगारकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडे आज एका निवेदनाव्दारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,?नगर परिषद प्रशासन नागरी सुविधा देण्यास अपयशी ठरत आहे. जालना पालिकेत निविदा, देयके अदा करण्याची कामे प्राधान्याने होत आहे. स्वच्छता विभागाअंतर्गत नगर परिषदेच्या सफाई कामगारा व्यतिरिक्त नगर परिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे कामगार देखील ठेवणे बंधनकारक असतांना प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे केवळ दिखाव्या करीता कामे केली जातात. सदर कामाचा दर हा चौ.मी.वर आधारीत असतो. प्रत्यक्षात कामाच्या मोबदल्याच्या 20% कामे होतात. त्यामुळे स्वच्छतेचा हेतू साध्य होत नाही.


तसेच नगर परिषदकडे स्वतःच्या घंटागाडी आहेत. त्यापैकी किमान 10 ते 15 गाड्या ह्या नादुरूस्त असून नियोजना अभावी 10 ते 15 दिवस दुरुस्तीसाठी कालावधी लागतो. पर्यायाने शहरातील विविध भागातील कचर्‍याची विल्हेवाट लावता येत नाही. घनकचरा प्रकल्प कित्येक वर्षांनी रखडलेला आहे. तेथील बजेटची कामे जलदगतीने पूर्ण होतात. मग प्रकल्प कार्यान्वीत का? होत नाही असा सवाल या निवेदनात पांगारकर यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक घंटागाडीमध्ये एक मदतनीस निविदेच्या शर्तीनुसार असायला पाहिजे. प्रत्यक्षात चालका व्यतिरिक्त कोणीही सोबत नसते. त्यामुळे माता भगिनींना स्वतः कचरा टाकावा लागतो. परंतू निविदेप्रमाणे देयके अदा करण्यात येतात. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करणे गरजेचे असतांना पालिका प्रशासनाने याकडे देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
जालना शहरास घानेवाडी व जायकवाडी या दोन प्रकल्पाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. व्यवस्थित नियोजन केल्यास आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करणे शक्य होईल. सध्या 10 ते 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. अंतर्गत ठेकेदारास कायम विनादंडात्मक मुदतवाढ देवून पाठीशी घालण्यात येते. तसेच प्रभागातील बरीच कामे अपूर्ण आहे. काम केलेल्या काही भागात पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. पाणी साठा उपलब्ध असतांना जलकुंभाचे कामे अपूर्ण असून एसटीपीची कामे मंजूर असली तरी सदर कामे मागील 4 वर्षापासून जागेअभावी रखडली आहे. जागेत बदल करून काम तातडीने पुर्ण करावे अशी मागणी करुन शहरामध्ये लाईट दिवसा चालू आहे. वारंवार लेखी सुचना करून आजपर्यंत त्यावर कुठलीही उपाययोजना पालिका प्रशासनाकडुन करण्यात आली नाही. पंतप्रधान आवास योजनेचा मंजूर निधी लाभार्थ्यास देण्यास विलंब कोणत्या कारणामुळे होत आहे. याचा शोध घेण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
नामक नगर परिषदेने नेमलेले इंजिनीअर ए. डी. लोखंडे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी. इंदिरानगर मधून जाणार्‍या डी. पी. रोडच्या बाजुला सहान जागा असुन या जागेत वृक्षारोपन करावे या मागणीकडे देखील दुर्लक्ष होत असुन पालीकेच्या दुर्लक्षामुळे सदर भागात अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व मुद्यांकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर प्रश्‍न मार्गी लावावेत अशी मागणी भाजपा गटनेते अशोक पांगारकर यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *