ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करा – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार

September 12, 202112:43 PM 51 0 0

जालना, दि. 11 – जालना जिल्ह्यातील बदनापूर व जालना तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले असून या झालेल्या नुकसानीची राज्याचे महसुल, बंदरे, खार जमिनी व विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी करत उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देशही उपस्थित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्यमंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिले.


यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव, खोतकर,बदनापूरचे आमदार नारायण कुचे, माजी आ.संतोष सांबरे, भास्कर आंबेकर, ए. जे.पाटील बोराडे, बदनापूर पंचायत समिती सभापती बी. टी. शिंदे, अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, पंडीतराव भुतेकर,भगवान कदम ,भानूदास घुगे,बाळाभाऊ वाघ यांच्यासह उपविभागीय अधिकारी डॉ.संदीपान सानप, तहसीलदार छाया पवार, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, गटविकास अधिकारी विठ्ठल हरकर, तालुका कृषी अधिकारी व्यंकटेश ठेके आदींची उपस्थिती होती.
महसूल राज्यमंत्री श्री सत्तार म्हणाले,बदनापूर व जालना तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकामध्ये पाणी साचले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन,तूर, कापूस या पिकांना मोठा फटका बसला असून फळपीकही उध्वस्त झाले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतपीक व फळपिकांसह जनावरे, रस्ते,पूल तसेच घरांचीही पडझड झाली असून झालेल्या या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणांनी तातडीने करून अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश देत नुकसान ग्रस्तांना शासनामार्फत मदत केली जाणार असल्याचेही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर, अंबडगाव, नानेगाव तसेच जालना तालुक्यातील गोलापांगरी, बठाण, रेवगाव, साळेगाव घारे या गावांना प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून शेतकऱ्यांना धीर देत नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला शासना मार्फत नुकसान भरपाई देण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *