ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राजकीय बळाचा वापर करून खुलेआम चालतो वेश्‍याव्यवसायभाजपचा युवामोर्चा अध्यक्ष भागवत बावणे विरूध्द कारवाई करा ः विजय पवार

March 21, 202217:16 PM 40 0 0

जालना (प्रतिनिधी) ः काही महिण्याभरापुर्वी राजूर रोडवरील तुका हॉटेलवर खुल्याआम चालत असलेल्या देहविक्री केंद्रावर तात्कालीन पोनि. राजेंद्रसिंह गौर यांनी छापा मारला होता. त्याच धर्तीवर राजूर रोडवर असलेल्या तिरंगा, छमछम, जानकी अशा हॉटेलवर देहविक्रीचा व्यवसाय खुलेआम चालत असल्याचा आरोप करत राजकीय बळाचा वापर करून खुलेआम वेश्‍याव्यवसाय चालविणाऱ्या भाजपचा युवामोर्चा अध्यक्ष भागवत बावणे विरूध्द कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक विजय पवार यांनी केला आहे.
या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात पवार म्हणाले की, जालना-राजुर रोडवर तिरंगा हॉटेल, देवळगाव राजा रोडवरील छम छम हॉटेल, राजुर रोडवरील जानकी हॉटेल या हॉटेलमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सर्रासपणे पोलिसांच्या डोळ्यात धुळ झोकून सुरू आहे. मात्र राजकीय दबावापोटी पोलिस प्रशासनाने याकडे काना डोळा केला आहे. या देहविक्री व्यवसायामुळे अनेक तरूण या मार्गाकडे वळून भरकटत चालले आहे. तसेच एड्सचे प्रमाण देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी या देहविक्री व्यवसायाला वेळीच आवर घालावी अशी मागणी श्री पवार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *