जालना (प्रतिनिधी) ः जालना विधानसभा मतदार संघातील रामनगर (सा. का.) बाजी उम्रद, पीर कल्याण, कुंबेफळ येथे आज दि. 30 एप्रिल रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आ. कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आ. गोरंट्याल यांनी उपरोक्त गावामध्ये लसीकरण केंद्राच्या व्यवस्थेची पाहणी केली व तिथे संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधुन गावातील व परिसरातील सर्व 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण करुन घेण्याबाबत प्रवृत्त करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मतदार संघातील 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेऊन सर्वांनी ही लस घेण्याबाबत आव्हान केले. यावेळी राम सावंत, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वसंत जाधव, दत्ता पाटील घुले, अरुण घडलिंग, गणेश चौधरी, रामनगरचे सरपंच सोपान शेजुळ, संजय शेजुळ, मोरे, तसेच बाजी उम्रद येथे पं. स. सदस्य पांडुरंग डोंगरे, सरपंच , उपसरपंच, नंदू चव्हाण, बाळू पडुळ, श्रीधर डोंगरे,भगवान सवडे ,पिरकल्याण येथील नारायण शिंदे, दत्ता शिंदे, प्रताप शिंदे, प्रमोद वाघमारे, व सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कुंबेफळ येथील बाळू सिरसाट, सुदाम म्हस्के व सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply