ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मर्स्क कपंनी विरोधात निषेध आंदोलन

August 7, 202113:53 PM 60 0 0

उरण प्रतिंनिधी (संगिता पवार) जागतिक दर्जाची कंपनी असलेली मर्स्क सी.एफ.एस चे नाव मोठे आणि लक्षण खोटे अस आहे . कामगारांचा २०१७ पासून पगारवाढीचा करार प्रलंबित आहे . तसेच न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेने मर्स्क कंपनीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकित कोविड भत्याची मागणी केली होती ती मंडळाने मान्य करून १००० डॉलर म्हणजेच ७५ हजार रूपये प्रत्येकी मंजूर केले .

परंतू वरीष्ठ व्यवस्थापनाने ते स्वत : साठी घेतले व कामगारांना मात्र दिले नाही . ते मिळावेत तसेच २०१४ च्या करारनाम्यानुसार महागाई भत्ता मिळावा , या प्रलंबित मागण्यांसाठी आज दि . ६ ऑगस्ट रोजी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले . जर या मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर व्यवस्थापनाला इकडे फिरकु देणार नाही असा सज्जड टम कागार नेते महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी दिला . या आंदोलन प्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के.रामण , सरचिटणीस वैभव पाटील , महाराष्ट्र इंटकचे उपाध्यक्ष विनोद म्हात्रे , उरण ता . इंटक अध्यक्ष संजय ठाकूर , संघटनेचे पदाधिकारी प्रेमनाथ ठाकूर , अंगद ठाकूर , लंकेश ठाकूर , प्रांजल भोईर , आनंद ठाकूर , राजेश ठाकूर , अरूण पाटील , योगेश रसाळ , विवेक म्हात्रे , आदीत्य घरत विविध कंपन्यांतील कामगार प्रतिनिधी व मर्स्क कंपनीचे कामगार उपस्थीत होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *