ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रायगड जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलने

August 8, 202212:25 PM 17 0 0

उरण ( संगिता पवार ) : कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.  नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार रायगड जिल्हा अध्यक्ष मा. महेंद्रशेठ घरत तसेच रायगड जिल्हा प्रभारी सौ. चारुलता टोकस, सह्प्रभारी श्रीमती राणी अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यात पेण, पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर, म्हसळा, माणगांव येथे केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध करण्यात आला.

केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतांना जीवनावश्यक वस्तूंवरील GST लावून सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पाहात आहे. बेरोजगारीने कहर केला असून तरुणांचे भविष्य अंधारात आहे. महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत या सर्व गोष्टींना आमजनता त्रासली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या या निषेध आंदोलनात सामान्य जनता उस्फुर्तपणे सहभागी झालेली दिसून आली.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *