ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जनवादी महिला संघटनेची उरण मध्ये महागाई विरोधात निदर्शने

July 28, 202115:03 PM 57 0 0

उरण प्रतींनिधी (अश्विनी धोत्रे.) : केंद्र व राज्य सरकारच्या जनताविरोधी धोरणांमुळे करोना काळात ही प्रचंड वाढत्या महागाईला जनतेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्याना जीवन जगणे कठीण बनले आहे. या विरोधात मंगळवारी जनवादी महिला संघटनेच्या वतीने उरण मधील गांधी चौकात महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या,करोना काळ असतांनाही उरण तालुक्यातील विविध गावातून महिला या निदर्शनात सहभागी झाल्या होत्या. महागाई कमी करा,सर्व नागरिकांना किमान 15 किलो धान्य वाटप करा,महागाई वाढविणाऱ्या वाढविणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,सर्वाना मोफत व मुबलक लस पुरवठा करा ,रेशन दुकानात भाव फलक लावा आदी मागण्यांसाठी घोषणा देण्यात आल्या.


यावेळी जनवादी महिला संघटनेच्या राज्य नेत्या हेमलता पाटील यांनी केंद्र सरकारच्या जनताविरोधी धोरणाचा समाचार घेतला तर जनवादी महिला संघटनेच्या रायगड जिल्हा अध्यक्ष ज्योती म्हात्रे यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने धोरणे राबविण्याची मागणी केली.तसेच कुसुम ठाकूर यांनी करोना काळात जनतेला झालेला त्रास हा अयोग्य होता,नागरीकाना सुविधा पुरविणे हे सरकारचे काम असल्याचे सांगून या विरोधात आमचा लधानसुरुच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निदर्शना नंतर महिलांचा मोर्चा उरण तहसील वर नेण्यात आला त्यानंतर महिलांच्या एका शिष्ट मंडळाने उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांची भेट घेतली यावेळी महिलांनी त्यांच्या समोर तालुक्यातील विविध समस्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी महिलांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *