ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र बंदच्या पाठिंब्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

October 12, 202113:57 PM 4 0 0

उरण ( संगिता पवार ) उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांवर वाहन चालून त्यांची हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा करा या प्रमुख मागणीसाठी सोमवारी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला होता या बंदला पाठिंबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याची सी आय टी यु या कामगार संघटनेच्या वतीने उरण चारफाटा ते गांधीचौक अशी मिरवणूक काढून निदर्शने करण्यात आली.

शेतकऱ्यांची हत्त्या करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,मोदी, योगी सरकार मुर्दाबाद,आरोपीने कडक शासन झालेच पाहिजे, शेतकरी व कामगार विरोधी मोदी सरकार चले जावं,महागाई कमी करा, आदी जोरदार घोषणाबाजी करीत ही मिरवणूक काढण्यात आली. मोर्चा समोर सीआयटीयु चे नेते कामगार विस्वस्त कॉम्रेड भूषण पाटील यांनी शेतकरी मागील वर्षभरापासून दिल्लीच्या सरहद्दीवर नेटाने लढत असून लखीमपूर खेरी येथे आंदोलन करीत असताना केंद्रीय गृहमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर वाहनाने हल्ला करून चिरडून त्यांची हत्या केली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत असल्याचे सांगून या जनताविरोधी सरकारला हटविण्याचा निर्धार करण्यात आला. त्याच प्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे रायगड जिल्हा सचिव कॉम्रेड संजय ठाकूर यांनी केन्द्र व उत्तर प्रदेश सरकारचा जाहीर निषेध केला तसेच गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी केली.यावेळी सीआयटीयु चे रायगड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मधुसूदन म्हात्रे,किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे, डी वाय एफ आय चे रायगड जिल्हा अध्यक्ष दिनेश म्हात्रे आदीजण उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *