ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंचशील नगर येथील महिलांची महापालिकेसमोर निदर्शने

July 12, 202113:38 PM 7 0 0

नांदेड – शहरातील खडकपुरानजीक असलेल्या पंचशील नगरातील महिलांनी पाणी, घरकुल, रोड, नाल्या, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन आदी सुविधांसाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात प्रत्येक घरासमोर चा प्रेशर लाईन चा पाइप जोडण्यात यावा.

पंचशील नगर येथे २५ टक्के लोकांनाच घरकुल मंजू झालेले असून‌ बाकी लाभार्थ्यांनाही घरकुल मिळणे बाकी आहेत ते मंजूर करण्यात यावे, नगर मधील रोड अत्यंत अडचणीचे आहेत ते चालण्यासारखे नाहीत. रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे, या नगरमध्ये ७५% नाल्यांचे काम करण्यायोग्य आहे. ते करण्यात यावे. ड्रेनेज लाईन लवकरात लवकर चालू करण्यात यावी. वरील मागण्या पूर्ण नाही तीव्र प्रकारचा मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर पंचशील नगर येथील अनिल थोरात, वैशालाबाई धुळे , वंदनाबाई थोरात, कलावतीबाई गोडबोले, उषाबाई जमदाडे, जिजाबाई पारदे हरणाबाई वाघमारे, शिलाबाई सातोरे, बबन हटकर, अंबिकाबाई नवगिरे, मिनाबाई राजभोज, पूजा हिंगोले कल्‍पनाबाई खाडे, गोडबोले, साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *