जालना (प्रतिनिधी) सरकारकडून सध्या मोफत लसीकरणाचा उपक्रम सुरु आहे. हा उपक्रम स्तुत्य असला तरी या सुविधेचा लाभ जसा जुन्या जालन्यातील नागरीकांना मिळत आहे तसा तो नवीन जालना भागातील नागरीकांना मिळत नाही म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्यावतीने नवीन जालन्यासाठी स्वतंत्र लसीकरण व स्वॅब टेस्ट सेंटर उभारावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभय करवा यांनी केली आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. करवा यांनी म्हटले आहे की, नवीन जालना आणि जिल्हा रुग्णालयाचे अंतर आणि तेथे जाऊन लसीकरण करुन घेण्यास नागरीक फारसे धजावत नाहीत. याशिवाय नवीन जालना भागातील नागरीकांना तेथपर्यंत जाणे, रांगेत उभे राहून केव्हा आपला नंबर येतो याची कोणतीही खात्री नसते. त्यामुळे बहुतांशी नागरीक हे त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहेत. पर्यायाने या मोफत लसीकरणाचा कोणताही लाभ हा नवीन जालन्यातील नागरीकांना होतांना दिसून येत नाही. काही मंडळी तर चक्क जाण्या- येण्याच्या भाड्याचा विचार करुनच जाणे टाळतात. एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली आणि त्याला स्वॅब टेस्ट करुन घ्यायची असेल तर हीच अडचण अनेकदा दिसून येत आहे. त्यामुळे या संदर्भात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ही अडचण लक्षात घेऊन नवीन जालन्यासाठी एक सुसज्ज असे केंद्र सुरु करावे, जेेणे करुन नागरीकांची अडचण दूर होईल, असेही श्री. करवा यांनी या प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
Leave a Reply