ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कर्जदारांसाठी सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा। मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

May 10, 202114:24 PM 15 0 0

जालना ( प्रतिनिधी) : राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी वित्त संस्थांच्या कर्ज परतफेडीस ( मोरेटोरी यम )सवलतीचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी मराठा महासंघाचे संतोष कऱ्हाळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे .

या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या ऑनलाईन निवेदनात संतोष कऱ्हाळे यांनी म्हटले आहे की, देशासह संपूर्ण जगभरात कोरोना महामारी मुळे उदभवलेल्या टाळेबंदी च्या संकटात सर्व स्तरावरील व्यवसाय आर्थिक मंदीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. तसेच नोकरदार वर्ग ही हतबल झाला असून अशा कठीण परिस्थितीत खाजगी वित्तीय संस्था वसुलीसाठी तगादा लावून कर्जदारांना दमदाटी करत आहेत. असे संतोष कऱ्हाळे यांनी निवेदनात नमूद केले. आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या सर्वसामान्य कर्जदारांना दोन वेळच्या अन्नाची भ्रांत पडलेली असून कर्ज फेडायचे कसे या विवंचनेने कर्जदारांना ग्रासले आहे. अशा स्थितीत कर्ज वसूली साठी दबाव आणला जात असेल तर या वर तोडगा काढण्याची गरज व्यक्त करत संतोष कऱ्हाळे यांनी गतवर्षी प्रमाणे या ही वर्षी सर्व बँका व खाजगी वित्तीय संस्थांच्या कर्जदारांसाठी कर्ज भरण्यास सवलतीचा ( मोरेटोरियम) पर्याय उपलब्ध करून द्यावा. सर्व बँका व खाजगी वित्त संस्थांनी मागील थकबाकी साठी तगादा लावू नये. तर सदरील थकबाकी वाढीव हप्त्यांच्या माध्यमातून वसूल करावी. असे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी लेखी निवेदनात संतोष कऱ्हाळे यांनी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *