जालना प्रतिनिधी :- जालना तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिंकाचे व घरांची झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी म्हणून आज वंचित बहुजन आघाडी जालना तालुका अध्यक्ष अॅड कैलास रत्नपारखी यांनी आपल्या शिष्टमंडळासह जालना तहसिलदार यांना निवेदन देऊन तात्काळ पिकाचे व पडलेल्या घरांचे पंचनामे करून त्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली.
जालना तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयबीन, मुग, उडीद, कापूस या पिकाचे नुकसान झाले असून घराची सुद्धा पडझड झाली असून तात्काळ शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडी जालना तालुकाच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर अँड कैलास रत्नपारखी, गौतम वाघमारे, वैभव वानखेडे, विलास नरवडे, भानुदास साळवे, चंद्रहारी गायकवाड, दगडु जाधव, कैलास जाधव, संदिप साळवे, भैय्यासाहेब खरात, शिवदास म्हस्के, अक्षय जाधव, गोपाल गावडे, मिलिंद पारखे, कैलास जाधव, प्रमोद भालमोडे, अमोल खरात, प्रशिक सम्राट, नितीन बाळराज साळवे सह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply