जालना (प्रतिनिधी) ः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीतून जालना विधानसभा मतदार संघातील पात्र शेतकऱ्यांना तातडीने आर्थीक मदत करण्यात यावी अशी सुचना आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केली. जालना तहसील कार्यालयात आज शुक्रवारी तहसीलदारांच्या आयोजीत करण्यात आलेल्या जालना शहर संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमूद, नायब तहसीलदार मयुरा पेरे यांच्यासह निराधार समिती सदस्य डॉ. विशाल धानुरे, नंदकिशोर जांगडे, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर भांदरगे, विनोद यादव, सय्यद मुस्ताक यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले सप्टेंबर महिण्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून सदर रक्कम वर्ग देखील केली आहे. जालना विधानसभा मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम तातडीने जमा करण्याचे निर्देश आ. गोरंट्याल यांनी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांना या बैठकीत दिले. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या 500 प्रकरणाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येइल असे सांगुन या योजनेअंतर्गत यापुर्वी बोगस लाभ उचलणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेवूनत्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना आ. गोरंट्याल यांनी दिल्या आहे. बैठकीच्या प्रारंभी तहसीलदार श्रीकांत भुजबळ व नायब तहसीलदार मयुरा पेरे यांनी प्रास्ताविक करून संजय गांधी निराधार समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल व समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या बैठकीस महसुल सहाय्यक ज्ञानेश्वर गोरे, अव्वल कारकुन शिल्पा मगरे, अरून घडलिंग आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply