ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रोटरी मिडटाउन तर्फे आज प्रांतीय प्रशिक्षण शिबिर

September 5, 202117:20 PM 11 0 0

जालना ( प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाउन तर्फे रोटरी परिवारातील नवीन सदस्यां करिता प्रांत स्तरावरील प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवारी ( ता. 05) जालना शहरात आयोजित करण्यात आले असून रोटरी चे प्रांतपाल रो. ओमप्रकाश मोतीपवळे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत यांनी दिली.

शिबीराच्या आयोजना बाबत अधिक माहिती देतांना रो. महेश धन्नावत म्हणाले,प्रांत 3231 विभाग सी. अंतर्गत आयोजित केलेले शिबीर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील हॉटेल सॅफरॉन येथे सकाळी 10.30वा. या शिबीराचे उद्घाटन होईल. या वेळी रोटरी च्या उपप्रांतपाल रो. डॉ. सुमित्रा गादीया, रो. रागिणी कंदाकुरे, रो. पुष्पा आरबळे, रो. मनिष नय्यर, रो. दादा करंजुले, रो. दिलीप मालपाणी,
समुपदेशक रो. दीपक पोफळे, संचालक रो. संजय अस्वले, माजी अध्यक्ष रो. गोविंदराम मंञी, समन्वयक रो. मनमोहन भक्कड, यांची प्रमुख उपस्थिती राहील
.निस्वार्थ समाज सेवा आणि सामाजिक कार्य या ध्येयासाठी अंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या रोटरी परिवाराचे ध्येय, कार्य पध्दती, समाजाच्या गरजेनुसार राबविण्यात येणारे उपक्रम,रोटरी शिस्त, परंपरा, कार्य शैली याची नवीन सदस्यांना माहिती व्हावी,रोटरी च्या वरिष्ठ स्तरावरून प्राप्त होणारे समाज उपयोगी कार्यक्रम, उपक्रम, याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी या संदर्भात प्रांत पॉल रो. ओमप्रकाश मोतीपवळे हे मार्गदर्शन करणार आहेत. असे सांगून रो. महेश धन्नावत यांनी या शिबीरात जालन्या सह औरंगाबाद, अहमदनगर, येथील रोटरी परिवाराचे 26 क्लबमधील सदस्य सहभागी होणार आहेत. तरी जालना रोटरी परिवारा अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध क्लब च्या पदाधिकारी व नूतन सदस्यांनी या प्रशिक्षण शिबीरात सहभागी व्हावे. असे आवाहन रोटरी मिडटाउन चे अध्यक्ष रो. महेश धन्नावत, सचिव प्रशांत बागडी यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *