ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मानसशास्त्रीय डॉ. अनुराधा करिगर यांचे आत्महत्या विषयावर व्याख्यान

December 1, 202115:42 PM 50 0 0

उरण (रायगड) : उरण काळा धोंडा येथील स्थानिक भूमिपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी व या शेतकऱ्यांच्या मागणीस न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे या अनुषंगाने दिनांक २७/११/२०२० पासून कोट नाका येथील साखळी उपोषणास सुरुवात झाली होती परंतु कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना प्रसारास आळा बसण्यासाठी आंदोलनाच्या ८४ व्या दिवशी हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा आपल्या हक्काचा लढा देण्यासाठी या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून दिनांक १५/११/२०२१ पासून या आंदोलनाच्या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.

रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळा धोंडा उरण व कोटगाव ग्राम सुधारणा मंडळाचे पदाधिकारी व सर्व ग्रामस्थ महिला बंधू भगिनी यांच्या या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आपल्या भाषणांतून आंदोलनकर्त्यांत सकारात्मक पाठबळ दिले आहे त्यामुळे आंदोलन कर्त्यांस हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.
आणि आज याच आंदोलनकर्त्यांस , शेतकरी ग्रामस्थ महिला बंधू-भगिनी यांस ऊर्जा मिळण्यासाठी व त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांच्या मनात कोणताही न्यूनगंड निर्माण न होण्यासाठी व आपण जे करत असलेले आंदोलनाचे फलित अजूनही आपल्या पदरात न पडल्यामुळे त्यांच्या मनात नैराश्याची भावना निर्माण होऊ नये, तसेच प्रत्येकाच्या मनात आपल्या निश्चित ध्येय पूर्तीची सकारात्मकता निर्माण व्हावी, याकरता दिनांक २९/११/२०२१ रोजी प्रस्ताविक रेल्वे स्टेशन या ठिकाणी चालू असणारे साखळी उपोषण आंदोलन १०४ व्या दिवशी सकाळी ठिक १० वाजता कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण यांच्या विद्यमाने प्रेरक वक्त्या मानसशास्त्रज्ञां श्रीमती डॉ. अनुराधा करिगर यांचे ‘आत्महत्या’ या संवेदनशील विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ‘आत्महत्या’ हा फार संवेदनशील व नाजूक विषय आहे . अशा विषयावर फारसे कुठे बोलले जात नाही. किंवा या विषयावरील विस्तृतपणे कुठेही ऐकावयास मिळत नाही. परंतु डॉ.अनुराधा मॅडम यांनी या जमलेल्या आंदोलनकर्त्यांस आत्महत्या या विषयावर खूप छान आणि सोप्या भाषेत व्याख्यान दिले .आत्महत्या म्हणजे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय. आणि हे कृत्य का होते ?कसे होते? याबाबतीत खूप मोलाचे मार्गदर्शन मॅडमनी दिले. मॅडम यांनी सांगितले की, पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यता किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक चिंता, विकार, वैफल्य ,छिन्न झालेली मानसिकता ही कारणे आत्महत्याचे आहेत. तसेच एकाकी पडणे, आर्थिक संकटे, आत्मघृणा, न्यूनगंड ,भीती या भावना ही आत्महत्येस प्रवृत्त करीत असतात.
जगणं असाह्य होणे, कुठलाच मार्ग न दिसणे, आणि मग जगण्यास काहीच अर्थ न असण्याची भावना मनात निर्माण होणे, नैराश्यता, सहनशीलतेचा अंत ,नात्यातील संवाद कमी होणे, समोरच्यास समजून न घेण्याची भावना अशी एक ना अनेक कारणे स्वतःच स्वतःचा बळी घेण्यासाठी पुढे येत आहेत.
असे असले तरीही मॅडमनी या कारणमिम्हांसा पटवून देताना सांगितले की, जग जरी यांत्रिक गतीने पुढे जात असले तरीही समोरच्या माणसाच्या भावना , प्रेम, जाणीवा ओळखता यायला पाहिजे. त्याच्या बोलण्याचा कल, बोलण्यातील आर्तता याकडे जाणीवपूर्वक लक्ष देता आले पाहिजे. समोरच्याकडून नकारात्मक भाषेचा उच्चार होत असेल तर त्याला एकटे न सोडता त्याच्या मनातील भीती तो आवेश जाण्यासाठी जरा वेगळ्या विषयात त्याला गुंतवणे, त्याच्या मानसिकतेवर एक सक्षम आधाराची हळुवार फुंकर घालणे, त्याच्या मनाची नैराश्याता काढून त्याच्या त्या आर्त हाकेला प्रेमाची, समजुतीची साद देता आली पाहिजे. आपल्या भारतात एका मिनिटाला चार आत्महत्या होत आहेत ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अशा या आत्महत्या रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या संबंधित असणाऱ्या माणसासोबत सुसंवादात राहायला शिकायला हवे .शक्यतो त्यांच्या मनातील भावनांचा कल्लोळ कोणत्या प्रकाराने त्यास समजुतीने व आपलेपणा देता येईल हे जाणून तसेच आपल्यामुळे निदान कुण्या एकाची तरी आत्महत्या आपण रोखू शकतो, असा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.
आजच्या या व्याख्यानात जमलेल्या श्रोत्यांकडूंन स्वता त्यांना बोलते करून त्यांच्या कडून सुंसवाद साधुन, डॉ.अनुराधा मॅडम यांनी कमी वेळात पण फार मौलिक शब्दांची पेरणी करून उपस्थित ग्रामस्थांची मने जिंकली.
यावेळी कोटगाव ग्राम सुधारणा मंडळ उरण व कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण यांचे सन्माननीय पदाधिकारी व शेतकरी ग्रांमस्थ बंधू-भगिनी या व्याख्यानासाठी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *