जालना ( प्रतिनिधी ) अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथील वंचित बहुजन आघाडी च्या महिलांचा आम आदमी पार्टी जालना तालुका अध्यक्ष श्री.सुभाष बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली दि.०५ रोजी आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी कुशिवर्ता ढिल्पे, लताबाई ढिल्पे, सोजरबाई गाढे, रुख्मिणी बाई गाढे, कांताताई गाढे, छायाबाई ढिल्पे, इंदुबाई ढिल्पे, मंडाबाई गाढे, केसरबाई गाढे, रेखा उघडे, दर्शना सोनवणे, पुजा हिवाळे, जनाबाई गाढे, माल्हनबाई पाजगे, ताराबाई पाजगे, सोमित्राबाई ढिल्पे या व इतर महिलांनी प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे, जिल्हा संघटनमंत्री सुभाष देठे, मराठवाडा सचिव अनिल ढवळे, काकासाहेब भालेराव व मठ पिंपळगाव गावातील घुले मामा [माजी सरपंच] यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply