मुरूड -जंजिरा (प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) मुरूड -जंजिरा नगरपरिषदेच्या सभागृहात राष्ट्रीय-विधी सेवा प्राधिकरण(NALSA) मार्फत ज्येष्ठ नागरिकांना उपलब्ध होणा-या कायद्याच्या सेवांबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी पाणीपुरवठा सभापती नगरपालिका मुरूड मान.आरेकर सर यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगून जेष्ठ नागरिक संघटना उपाध्यक्ष मनोहर दिघे, मार्गदर्शक अॅड.मृणाल खोत,अॅड.डी. एन पाटील ,अॅड. रूपेशपाटील ,अॅड..कृणाल जैन , पत्रकार मेघराज जाधव सर सौ नैनिता कर्णिक यांचा सन्मानिय नगराध्यक्षा स्नेहा पाटील (माई) शिक्षण सभापती मान. नौसिम दरोगे मॅडम, नगरसेवक प्रमोदजी भायदे, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
अॅड मृणाल खोत यांनी जेष्ठ नागरिक यांच्या साठी काही कायदे केले आहेत . त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती केल्यामुळे कायद्याची माहिती मिळाल्याने अन्याय कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातील.हा महत्वाचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केले.कायदे करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जो जेष्ठ नागरिकांना आर्थिक, मानसिक, शारीरिक त्रास कमी करणे. कारण आजची तरुण पिढी आपल्या आई , वडिलांना सोडून देतात, घरात ही हाल करतात अशावेळी जेष्ठ नागरिकांनी काय करावे फोजदारी कलम १२५ पोटगीचा अधिकार या द्वारे मुले, नातेवाईक यांच्या कडून वसुल करण्यासाठी दावा करता येतो व त्यासाठी कोर्टाचा खर्च तालुकार-विधी मार्फत केला जातो .
मालमत्ता जरी नावावर केली असेल तरी रद्द करण्यात येते.पालनपोषण करणे फक्त कर्तव्य नसून बंधनकारक असल्याचे प्रतिपादन केले.वृद्धाश्रमवर आधारित स्वरचित कविता ऐकवली. अॅड डी.एन.पाटील यांनी जेष्ठ नागरिक यांनी आपल्या अन्यायाविरुद्ध अर्ज करण्यासाठी वार्षिक उत्पादनाचा दाखला देणे आवश्यक आहे.वस्तूच्या लीलावाद्वारे आप्त नातेवाईक यांच्या कडून पैसे कसे मिळविता येतात हे उदाहरणा द्वारा स्पष्ट केले.पोटगी दिली नाही तर पोटगी न देणाऱ्याला जेलमध्ये रवानगी करण्यात येते असे निर्देशनास आणून दिले.सेवानिवृत्त तहसिलदार तथा सेवानिवृत्त संघटना अध्यक्ष नयन कर्णिक, जेष्ठ नागरिक सीताराम दिवेकर यांनी आजच्या मार्गदर्शनात
खूपच चांगली माहिती मिळाली याचा जेष्ठ नागरिक यांना चांगलेच फायदे होतील असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. नगरपरिषद पाणीपुरवठा सभापती मान.पांडुरंग आचरेकर सर यांनी यांनी नगरपालिकेने १०० टक्के लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे व११ तारखेला खास महिलांसाठी लसीकरण कार्यक्रम ग्रामीण रुग्णालयात आयोजीत करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी मुरूड नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपस्थित असलेल्याचे मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमांची सांगता केली.
Leave a Reply