ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुरुड जंजिरा नगरपरिषद तर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत पथनाट्याव्दारा जनजागृती

October 30, 202114:02 PM 56 0 0

मुरुड जंजिरा ( प्रतिनिधी,सौ नैनिता कर्णिक) :  निसर्गाचा समतोल साधण्यासाठी, मानव निर्मीत प्रदुषणामुळे जैवविविधतेवर, पर्यावरणावर, तसेच मानवी आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम त्याच बरोबर पर्यावरणाची हानी कमी करण्यासाठी कराव्या लागणा-या उपाय योजना शहरातील नागरीकांपर्यंत पोहचविण्या करीता मा.जिल्हाधिकारी रायगड डॉ. महेन्द्र कल्याणकर, यांचे मार्गदर्शनाखाली व मुरुड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज अ. भुसे यांच्या पुढाकारातून गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी मुरूड शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यांत आले. सदर रॅलीला नगरपरिषद कार्यालयातून सकाळी 9.00 वा. शहराच्या नगराध्यक्षा . स्नेहा पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करुन दिली. या प्रसंगी उपनगराध्यक्षा श नौशिन दरोगे व पर्यटन नियोजन समिती सभापती.

युगा ठाकूर या उपस्थित होत्या. तसेच नगरपरिषदेचे सन्माननीय सदस्य प्रमोद भायदे , अविनाश दांडेकर यांनीही इतरांसोबत सायकल रॅलीमध्ये सायकल चालवून सहभाग नोंदविला. सदर रॅली बाजारपेठ, एकदरा ब्रिज मार्गे जाऊन रॅलीचा समारोप विश्रामबाग येथे करण्यात आला. समारोपाच्या ठिकाणी मुरुड हॉटेल चालक मालक संघटना यांच्या मार्फत चालू असलेल्या समुद्र किनारा सफाई अभियानात सायकल रॅली मधील सहभाग असलेल्यांनीही श्रमदान करुन अभियानास सहाय्य केले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील, अशोक पाटील सचिव, व इतर पदाधिकारी उपस्थित होते. त्याच प्रमाणे माझी वसुंधरा अभियाना अंतर्गतच फटाक्यामुळे होणारे प्रदुषण टाळून प्रदुषण रहीत उत्सव साजरा करण्याचे व स्वच्छतेचा संदेश देणारे जन जागृतीपर पथनाटयाचे आयोजन आझाद चौक व शहरातील इतर मुख्य ठिकाणी करण्यांत आले. त्यास शहरातील नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या प्रसंगी नगराध्यक्षांनी, फटाक्यांमुळे होणारे प्रदुषण टाळून प्रदुषणरहीत हरित उत्सव साजरा करावा व निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलून नगरपरिषदेस सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *