जालना (प्रतिनिधी) : जालना तालुक्यातील मौजे कडवंची येथील तरुणांनी केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन व गावाच्या सर्वांगीण, चौफेर विकासासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांच्या उपस्थितीत आज दि.१८ सप्टेंबर २१ रोजी, भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयामध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्व प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे यांनी पक्षामध्ये स्वागत केले.
यावेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कृष्णा सरोदे, देविदास जारे, सर्जेराव भावले, पृथ्वी साळवे, गोरख गायके, दशरथ जारे यांच्यासह विलास भावले, ऋषीन्दर शेळके, दुर्गेश गुलाबराव जारे, गणेश कैलाश गिरी, संतोष सुखदेव जारे, ज्ञानेश्वर तुळशीराम सरोदे, नामदेव कोंडीराम जारे, सतीश जारे, रवींद्र बापूराव आंबीलवाडे, निवृत्ती सवडे, राजेंद्र कासार, सुदर्शन जारे, भरत शेळके, कैलाश भावले, गोवर्धन सरोदे, ब्रम्हा जारे, दत्तात्रय जारे, प्रा.रामदास जारे आदींनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपस्थित जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते, अंकुश जारे, सचिन कोल्हे, कृष्णा शिंदे, विकास कदम आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply