उरण ( संगिता पवार ) न्यू बंगाली नेताजी क्लब उरण यांच्या वतीने उरण नगरपरिषदेचे नाना साहेब धर्माधिकारी शाळेच्या प्रांगणात सदर पूजेचे आयोजन करण्यात आले होते . सार्वजनिक श्री ,श्री दुर्गा देवी पूजा चे आयोजन करण्यात आले होते .सदर पूजा ही मंगळवार ( दि.१२ ) ते गुरुवार ( दि. १४ ) पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .दसऱ्या च्या दिवशी दुर्गा मातेचे विसर्जनकरण्यात आले यंदाचे १५ वे वर्ष आहे .सकाळी व सायंकाळी पूजा करण्यात आली.
उरण चे आमदार महेश बालदी, भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर ,उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह , भाजपा वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष सुधिर घरत , भाजपा उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील , भाजपा उरण तालुका उपाध्यक्ष पंडीतशेठ घरत , भाजपा जिल्हा युवा उपाध्यक्ष शेखर तांडेल ,भाजपा उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील ,यांनी उपस्थित राहुन दुर्गा देवीचे दर्शन घेतले . न्यू बंगाली नेताजी क्लब उरण चे अध्यक्ष सपन सुधिर करण ,व सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य मिळाले .
Leave a Reply