उरण ( संगिता पवार ) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते बुधवार( दिनांक ८ ) रोजी मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण” चे अध्यक्ष श्री विशाल विजय पाटेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली उरणचे आमचे लाडके माननीय आमदार श्री महेशशेठ बालदी, भाजपा तालुका अध्यक्ष माननीय रवि भोईर,तसेच मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण ची ५ वर्ष पूर्ण झाली
त्यानिमित्त तसेच हिंदू सणाबद्दल समाजाच्या प्रत्येक तरुणांमध्ये आणि घराघरांमध्ये आपली संस्कृती जपून ती पुढे कशी वाढवता येईल या अनुषंगाने आपल्या सर्वांना सामाजिक रित्या एकत्रित जोडणारा आपल्या सर्वांचा सण म्हणजे गणेशोत्सव यानिमित्ताने आरती पुस्तक चे उद्घाटन करण्यात आले. हे ही आरती संग्रह मी उरणकर सामाजिक संस्थेचे सभासद, कार्यकर्ते घरपोच वाटप करणार आहेत. असे मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,उरण चे अध्यक्ष विशाल पाटेकर यांनी सांगितले .
Leave a Reply