ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बठाण खुर्द शिवारातील नुकसानीचे पंचनामे सुरु

September 14, 202113:01 PM 7 0 0

अंबड/प्रतिनिधी तालुक्यातील बठाण खुर्द परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून मोठ्याप्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून, महसूल विभागाच्यावतीने रविवारी या भागातील पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. बठाण खुर्द शिवारात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत.

यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून कापशी, तूर, सोयाबीन, मका, मूग, उडीद यासह मोसंबी, ऊस ही पिके उद्ध्वस्त झाली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार रविवारी तलाठी सी. टी. खिल्लारे, कृषी सहायक एम. बी. पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जावून पीक नुकसानीचा आढावा घेवून पंचनामे केले आहे. यावेळी शेतकरी जालिंधर वीर, भगवान मुळे, भुजंग केंधळे, सुरेश वीर, सतीश काकडे आदींची उपस्थिती होती. शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *