ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तीर्थपुरी शहरात विनामास्क रहदारी करणा-या आस्थापना व नागरीकांवर दंडात्मक कारवाई

January 15, 202213:28 PM 51 0 0

जालना  :- तीर्थपुरी शहरात कोविड नियमावलीचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर व आस्थपनावर उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या नेतृत्त्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावेळी कार्यवाहीमध्ये तहसीलदार घनसावंगी नरेंद्र देशमुख,मुख्याधिकारी नगरपंचायत तीर्थपुरी गौरवकुमार खैरणार , मंडळ अधिकारी श्री. पाठक, तलाठी राजु शेख, सह पोलिस निरीक्षक दिपक लंके, पोलीस कर्मचारी योगेश दाभाडे, नगरपंचायत कर्मचारी श्री. शिंदे, श्री. माळी यांचा सहभाग होता.

यावेळी 43 विनामास्क रहदारी करणा-या नागरीक व आस्थापनांकडुन शासकीय नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करत 2 हजार 600 रुपये दंड वसुल करण्यात आला व संबंधीतांना समज देण्यात आली व परिसरातील सर्व नागरीकांना लसीचे दोन डोस घेण्याचे तसेच मास्क वापरुन गर्दी न करण्याचे सोशल डिस्टंसींगचे पालन करुन कोरोना दुर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *