ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण-गोवठणे गावातील शेकाप कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

October 11, 202115:50 PM 48 0 0

उरण(संगिता पवार) वंदनीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ज्वलंत भगव्या विचारांना प्रेरीत होऊन मा.मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब , पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत ठाकूर साहेब व उरणचे दमदार आमदार महेशजी बालदी साहेब, मा.आमदार देवेंद्रजी साटम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून श्री.संतोष वर्तक सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.हरेश पाटील, श्री.रमाकांत पाटील,श्री.अनंता पाटील, श्री. वैभव पाटील, श्री. अक्षय पाटील, श्री.राजा पाटील, श्री. अरुण कडू,श्री.अशोक कडू यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहिर प्रवेश केला.


ह्या कार्यक्रमासाठी भाजपा कार्यकर्ते श्री.संतोष वर्तक,गाव अध्यक्ष रोशन म्हात्रे,गोवठणे ग्रामपंचायत सदस्य श्री.मनोज पाटिल,श्री.संतोष वर्तक,श्री.निर्णय पाटिल,महिला तालुका अध्यक्षा राणी म्हात्रे,महिला गाव अध्यक्ष विश्रांती म्हात्रे, जेष्ट कार्यकर्ते श्री.मच्छिंद्र वर्तक,श्री.यशवंत वर्तक,श्री.यादव वर्तक,श्री.सुरेंद्र पाटिल तसेच युवा कार्यकर्ते सुरज म्हात्रे, प्रविण पाटिल,अतिश वर्तक,उमेश वर्तक,प्रेम पाटिल,विद्यानंद म्हात्रे,हर्षल म्हात्रे इत्यादि कार्यकर्ते उपस्थित होते.
संतोष वर्तक सर ह्यांच्या नेत्तृत्वात मोठ्या संख्येत शेकापक्षातून कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश घेतला . राष्ट्र – राज्याच्या सर्वांगीण विकासाठी प्रतिज्ञाबद्ध होत पक्षाच्या मूळ तत्व – धोरणाशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प केला.
श्री.संतोष वर्तकसर ह्यांचे सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी आहे . अंगणवाडीसाठी मदत,जिल्हा परिषदेच्या शाळे साठी बेंचेस,गरिब गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक कार्यक्रम,गावातील तरुणांसाठी सुसज्ज व्यायामशाळा, उरण तालुक्यातील 40 वर्षांवरील तरुनांसाठी सलग 10 वर्षे विनाशल्क क्रिकेटचे भव्य सामने आयोजित केले जातात.याच सामाजिक योगदानावर प्रभावित झाल्यामुळे हा पक्षप्रवेश पार पडला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *