उरण (अश्विनी धोत्रे) ः रायगड जिल्ह्यातील उरण शहरात नागरी वस्तीत मोठा अजगर आढळून आल्याने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले. हा अजगर उरण लिबर्टी पार्क झोपडपट्टी समोरील ओएनजीसीच्या कमपाउंडच्या जाळीवर आढळून आला.
हा अजगर सुमारे सात फुट लांबीचा असून इंडियन रॉक पायथन जाती आहे. या अजगराला पाहण्यासाठी मार्गावरून ये-जा करणार्या वाटसरूनी तुफान गर्दी केली होती. आढळून आलेल्या अजगराला पाहुन परीसरातील नागरीकांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावून घेतले. यावेळी सर्पमित्र राजेश नागवेकर यांनी त्या अजगराला पकडून द्रोणगिरी डोंगरतील जंगलात सोडून दिले.
टीप ः उरण आणि परीसरातील बातम्या पाठवण्यासाठी किंवा जाहिरातीसाठी उरण तालुका प्रतिनिधी अश्विनी निलेश धोत्रे 8097174186 यांना संपर्क साधावा.
Leave a Reply