ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरणच्या पेट्रोल विविध पंपावर वाहनांची लागलेली रांग

July 26, 202212:35 PM 23 0 0

उरण ( संगीता पवार ) : उरण उरणमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पंपावर शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. उरणच्या पेट्रोल विविध पंपावर याआधीच सीएनजीचा तुटवडा भासत आहे. सध्या उरण परिसरातील एक दोन सीएनजी पंप वगळता अन्य पंप बंदच आहेत. त्यामुळे सीएनजीचा तुटवडा उरणकरांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. त्यामुळे उरण परिसरातील सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला होता.

सीएनजीवर व्यवसाय करणाऱ्या रिक्षा, कार, टॅक्सी, टेम्पो तसेच अनेक खासगी गाड्यांचे वाहकही विविध पेट्रोल पंपावरच गाड्या उभ्या करून सीएनजीच्या प्रतीक्षेत रांगेत उभे असतात. मात्र कधी सीएनजीसी संपलेला तरी असतो किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने वाहनधारकांना कायम प्रतीक्षा करावी लागते. रविवारी ही (२४) वीजपुरवठा खंडित झाल्याने बोकडवीरा पंपावर पेट्रोल शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विचारणा केल्यानंतर नेहमीप्रमाणे पाहतो, काम सुरू आहे अशी कारणे अधिकाऱ्यांकडून दिली जातात.
सीएनजी ॅगॅस पंपावर गॅस उपलब्धता कमी असल्याने उरण मधील सीएनजी ॅगॅस पंपावर खूपच रांगा असतात त्यामुळे रिक्षाला तीन -ते चार तास रांग लावावी लाहते रिक्षेचे लोन ,त्यातच प्रवासी कमी ,त्यामुळे घरखर्च भागविणे पडवत आमचे उदरनिर्वाह रिक्षाच्या कमाई वर त्यातच कधी गॅस ची कमतरता तर कधी वीज गायब अशी समस्या नेहमीच उद्भवत असते ,त्यामुळे आमच्या धंद्यावर त्याचा परिणाम झाला आहे अशी खंत रिक्शा चालकांनी , यांनी व्यक्त केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share