ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत आर. एस. पी. ची बालचित्रकार कु. आर्या प्रथम

December 14, 202120:33 PM 40 0 0

सातारा, (विदया निकाळजे) : डॉ . श्रीरथना लक्ष्मी यांनी सरलक्विज ग्रुप विद्यमाने आयोजीत केलेल्या 27 वी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आँनलाईन चिलकला स्पर्धेमध्ये गोंदवले खुर्द ता. माण येथील रयत शिक्षण संस्थेचे, गोपालकृष्ण विद्यालयामधील कु.आर्या नितीन पोळ हिने आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकोली चित्रकले मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी , तसेच विविध प्रकारच्या भारतीय प्राचीन चित्रकला विषयांची माहिती व्हावी , या उद्देशाने सरलक्वीज ग्रुपच्या माध्यमातून स्पर्धेसाठी विषय – टिकुली कला देण्यात आला होता विषय – टिकुली हा बीहारमधील प्राचीन भारतीय कलाप्रकार आहे. टिकुली याचा अर्थ बिंदी, ही बिंदी स्त्रीयांच्या कपाळाला शोभते.

 

टिकुली कलेचा अत्याधुनिक कुशलतेने बनवलेल्या बिंदीचा रंजक इतिहास आहे. जो भारतीय, युरोपीय महिलांमध्ये खूप प्रिसिद्ध आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशातून स्पर्धक सहभागी झाले होते. कु. आर्याला डॉ. श्रीरथना लक्ष्मी यांचे वतीने सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. वसीम शेख, गीता गेंड, नेहा पोळ ,पल्लवी चौधरी, विराज पोळ या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवन्यात आले. सहभागी स्पर्धकांना कलाशिक्षक श्री. सादिक शेख सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. सादिक शेख सर यांचे माध्यमिक शिक्षण विभाग अधिकारी, रयत शिक्षण संस्था पदाधिकारी, मा.मुख्याध्यापक श्री. टकले एम. डी. सर शिक्षक,पालक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *