जालना ( प्रतिनिधी) : असंघटित कामगारांसाठी राज्य शासनाच्या अनेक महत्वकांक्षी योजना असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गरजवंतांना या योजनांचा लाभ देऊन कुटुंबातील चूली पेटवण्यास पुढाकार घ्यावा. असे आवाहन रा. काँ. असंघटीत कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दारकोंडे यांनी येथे बोलतांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागातर्फे तुळजाभवानी नगर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात रविवारी ( ता. १३) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी दारकोंडे बोलत होते. या वेळी आयोजक तथा जिल्हाध्यक्षा रेखाताई निकाळजे,दशरथ तोंडुळे, मणकर्णा डांगे, शिवसेना महिला आघाडी च्या शहराध्यक्षा मंजुषा घायाळ,प्रदेश सचिव उमाकांत सदाफुले, आबा सवदेकर, अमन गोसावी, गणेश चौधरी, बी. आर. सावंत,महेश तौर, पवन वैष्णव, यांची प्रमुख उपस्थिती होती. या
रक्तदान शिबीरात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत एक्कावन्न दात्यांनी रक्तदान केले.
रावसाहेब दारकोंडे पुढे म्हणाले की, कामगारांना असलेली ९० दिवसांची अट आंदोलनामुळे शिथिल करण्यात आली. असे त्यांनी नमूद केले.रक्तदान शिबीराचा उपक्रमाने रक्तसाठा वाढीस हातभार लागेल.तथापि बांधकाम कामगारांसह हमाल, मापाडी यांची नोंद करून शासकीय योजना, महामंडळांची कर्ज उपलब्ध करून देत सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन ही रावसाहेब दारकोंडे यांनी केले.
प्रास्ताविकात रेखा निकाळजे यांनी तीन हजार असंघटीत कामगारांची शासकीय दरबारी नोंद करून त्यांना लाभ मिळवून दिला असून गरजवंतांना कागदपत्रे देण्याची सेवा सुरू आहे. असे सांगून तरूण पिढीला स्फुर्ती देण्यासाठी रक्तदान शिबीर आयोजित केले. अशी भूमिका रेखा निकाळजे यांनी स्पष्ट केली.
सुञसंचालन आशीष रसाळ यांनी केले तर महेश तौर यांनी आभार मानले. या वेळी अलका झाल्टे, शेख महेजबीन, सुमित्रा जोशी, कल्पना मिसाळ, बळीराम भदरगे,शाकेरा सय्यद, मारिया गुढेकर, यांच्या सह पदाधिकारी , कामगार व रक्तदात्यांची उपस्थिती होती. जिल्हा सामान्य रूग्णालयाचे डॉ राजेश राठोड, अरूण धोञे, मोनिका पवार, सपना परदेशी, नितीन जाधव, सनी गुढेकर यांनी रक्त संकलन केले.
Leave a Reply