ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालन्यात उद्या क्रांती सेनेचा मातंग समाज मेळावा राधाजी शेळके करणार मार्गदर्शन

August 30, 202114:50 PM 27 0 0

जालना ( प्रतिनिधी) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे औचित्य साधून लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली जालन्यात उद्या मातंग समाज जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांनी दिली.


मंगळवारी ( ता. ३१) अंबड रोडवरील इंदेवाडी नजीक , पाण्याचा टाकीजवळ असलेल्या भोलेश्वर नगर भागात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या मेळाव्यास उद्योजक घनश्याम गोयल, गणेश शिंदे, शंकरराव क्षीरसागर, सर्जेराव शिंदे, शिवनाथ काळे, मनोहर उघडे, दादाराव कांबळे, महिला प्रदेशाध्यक्षा जिजाबाई शेळके, शिवबा शेळके, बाळासाहेब साबळे, बन्सीलाल भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला, तरूण व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे. असे आवाहन गणपत कांबळे, ज्ञानेश्वर शेडगे, अंकुश खोटे, बाळु काळे यांच्या सह आयोजकांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *