ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिजाऊ ब्रिगेडच्या जालना जिल्हाध्यक्षपदी राधाताई कडवकर

January 31, 202214:26 PM 37 0 0

जालना । प्रतिनिधी – ग्रामीण भागातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन चळवळ उभा करण्यासह ग्राम शाखा उघडणे व व गरजू महिलांची सखी होऊन त्यांच्यासाठी काम करण्याचा मानस जिजाऊ ब्रिगेडच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नवनियुक्त झालेल्या राधाताई कवडकर यांनी व्यक्त केला.
जिजाऊ ब्रिगेडच्या जालना जिल्हाध्यक्षपदी नूकतीच राधाताई कवडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर कवडकर यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यांचे आभार व्यक्त केले. प्रसंगी बोलतांना त्या म्हणाल्या की, परभणी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा मार्गदर्शिका हे पद भूषविले नंतर पुन्हा एकदा जालना जिल्हा अध्यक्ष पद देऊन पुरोगामी विचाराच्या चळवळीत कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझे नशीब समजते या संधीचे सोने करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करील जिजाऊ ब्रिगेड जालना हे प्रथमतः ग्रामीण भागात महिलांसाठी पुरोगामी व आर्थिक स्वावलंबन चळवळ उभी करण्याचे मी प्रयत्न करीन जिजाऊ ब्रिगेड मार्गदर्शिका म्हणून मी काम करताना ग्राम शाखा उघडणे, महिलांसाठी मोफत करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे महाविद्यालयीन मुलींसाठी मोफत करियर मार्गदर्शन करणे समाज रक्षक पोलीस बांधवांसाठी रक्षाबंधन अनाथ मुलींसाठी जेवण व भेटवस्तू शॉपिंग महोत्सव अशा उल्लेखनीय कार्याचा तसेच तीन वर्ष सलग तीन हजार पेक्षाही जास्त महिलांसाठी पुरोगामी विचारांचे हळदीकुंकू सर्व कार्याचा भाग मला होत आला होता आले याचा मी आनंद व्यक्त करते जिजाऊ ब्रिगेड मध्ये देखील कार्य करताना साहेबांची पत्नी यापेक्षाही गरजू महिलांची सखी होऊन
महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न करण्यावर भर देणार असल्याचेही शेवटी राधाताई कवडकर म्हणाल्या.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *