ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

क्रांतीसूर्याची सावली संयोजन समितीच्या अध्यक्षपदी राहुल खिल्लारे

May 21, 202215:32 PM 39 0 0

नांदेड – बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच आयोजित, शाहीर विनोद गोडबोले प्रस्तुत.. क्रांती सूर्याची सावली त्यागमूर्ती माता रमाई महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून तसेच बुद्धजयंती व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘क्रांती सूर्याची सावली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संयोजन समिती गठीत करण्यात आली असून अध्यक्षपदी राहुल खिल्लारे यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी नंदकुमार ससाणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती विचारमंचाच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमाची संयोजन समिती गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदी राहुल खिल्लारे तर सचिवपदी नंदकुमार ससाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष आनंद गोडबोले, तुकाराम खिल्लारे ग्रा प सदस्य, सचिव नंदकुमार ससाने, सहसचिव बाळासाहेब खिल्लारे, कोषाध्यक्ष आनंद धुतराज, सहकोषाध्यक्ष मोतीराम धुतराज, सल्लागार राम लोखंडे ,विष्णू गोडबोले, संभाजी खिल्लारे, लोभाजी गवारे, कैलास गोडबोले, श्याम वाघमारे, नवनाथ शेळके, प्रसिद्धीप्रमुख – अमोल खिल्लारे व प्रज्ञाधर ढवळे सदस्य- सुनील धुतराज, गणेश धुतराज, प्रकाश खिल्लारे,राजेश भोरगे, सचिन खिल्लारे, मिलिंद धुतराज,पप्पु सुर्यवंशी, महेश सावकार, मिलिंद गोडबोले, जनक गोडबोले, नागेश गोडबोले, गजानन गच्चे, सुदर्शन गोडबोले, अशी संयोजन समिती गठीत करण्यात आली.
नांदेड दक्षिण मतदार संघातील व लोहा तालुक्यातील सोनखेड येथे दिनांक 27 मे 2022 रोजी शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या ‘क्रांतीसूर्याची सावली’ या कार्यक्रमामध्ये, क्रांतीसुरांची संगीतमय मानवंदना सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते ‘झी युवा संगीत सम्राट फेम- अजय देहाडे, दूरदर्शन सूरसागर फेम- पियुष वासनिक, सुप्रसिद्ध गायक निवेदक हर्षद कांबळे, सुप्रसिद्ध गायक निवेदक चेतन चोपडे, सुप्रसिद्ध गायक लोककलावंत विनोद गोडबोले हे क्रांती सुरांची मानवंदना देणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *