ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

औरंगाबाद येथे पार पडलेल्या महाराट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये रायगड हेल्थ सेंटर (कोप्रोली-उरण) चे घवघवीत यश

January 28, 202213:56 PM 48 0 0

उरण (संगिता पवार ) : औरंगाबाद येथे आयोजिलेल्या “महाराट्र श्री” स्पर्धेसाठी उरण तालुक्यातील रायगड हेल्थ सेंटर, कोप्रोली या व्यायामशाळेतून विविध गटात खेळण्यासाठी पाच स्पर्धाकांची निवड करण्यात आली होती. सदरची स्पर्धा दि. २३.०१.२०२२ रोजी खेळली गेली असून त्यामध्ये महाराष्ट्र श्री. साठी खेळलेल्या प्रांजळ पाटील (खोपटे) यांना सहभाग म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र उदय गटात अजित म्हात्रे (वशेणी) यांनी सुवर्ण पदक पटकावला तर कुमार गटात संकेत वर्तक (गोवठणे) रजत पदक तसेच महाराष्ट्र श्रीमान पदकासाठी खेळलेल्या जितेंद्र पाटील (पाणदिवे) यांनी रजत पदक व शैक्षणिक क्षेत्रातील उपजत व्यक्तिमत्व, सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती क्षेत्रातील पुरस्कार विजेते, खेळाकडे देखील विशेष कल असलेले पाणदिवे गावाचे सुपुत्र विकास पाटील सर यांनी श्रीमान गटात वयाच्या ४८ साव्या वर्षी उत्तेजनार्थ पदक मिळवले. रायगड जिल्ह्यातून शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमच खेळणारे प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांचा आयोजकांतर्फे विशेष गौरव करण्यात आला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *