जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर धैर्यता हा गुण अंगी असायलाच हवा !…असं म्हणतात कि खरं जीवन कसं जगावं हे निसर्ग आपल्याला शिकवून जातो. कारण तिथे उमलणाऱ्या फुलांचा सुगंध असतो तो आपल्याला दुसऱ्याला आनंद कसा देता येईल ते शिकवतो!,आकाशात उडणारे पक्षी असतात ते आपले पंख फडफडत ठेवले कि आकाशात उंच गगनभरारी कशी घ्यायची ते शिकवतात !,निखळ आणि निर्झर वाहणारे झरे छोटेसे जरी असले तरी खळखळत वाहताना इतरांना सुखावनारा आनंद देत असतात !आणि म्हणूनच ज्यांचे व्यक्तित्व ..आनंदी,उत्साही,सकारत्मक असेल ती व्यक्ती स्वतः यशस्वी तर होतोच पण, इतरांसाठी पण सदैव प्रेरणादायी ठरतो
असंच प्रेरणादायी व्यक्तीमत्व ज्यांना ह्या निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं , त्या निसर्गाच्या अधिवासात मुक्तसंचार करणार्या प्राणी,पक्षी, जीवजंतू यांचं संवर्धन,संरक्षण आणि संगोपन करणं ज्यांना जमतं !, त्याच निसर्गाच्या दूर -दुर्गम कुशीत बागडणाऱ्या आदिवासी बांधवांना सावरणं आणि आधार देणं हे ज्यांच प्रथम कर्तव्य असतं !…असे … निसर्गप्रेमी …. आदिवासी मित्र …अर्थात …सन्माननीय … श्री राजू मुंबईकर साहेब …हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून …रायगड जिल्ह्यामध्ये… गरीब व गरजूवंत व्यक्तींच्यां मदतीकरीता व आदिवासी बांधवांच्यां सर्वांगीण विकासाकरीता सोबतच निसर्गाच्या संवर्धनासाठी, आणि वन्यजीवांच्यां संरक्षणासाठी करत असलेल्या मानवतावादी आणि आदर्शवत कार्याची दखल घेत … रायगड जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्था म्हणजेच … सोबती संस्था पेण… आणि … बापूसाहेब नेने फाऊंडेशन पेण ह्या नामांकित संस्थाच्यां वतीनं … पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने सभागृहात … विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा… आयोजित करण्यात आला आणि त्या सोहळ्यात … सन्माननीय …श्री राजू मुंबईकर साहेब यांना ….. शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुरस्कार रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन …गुणवंत पुरस्कार …ह्या पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं.
ह्या पुरस्कारांचे आयोजक … सोबती संस्था पेण आणि … बापूसाहेब नेने फाऊंडेशन पेण ह्या संस्थांचं खास वैशिष्ठ असं आहे कि ह्या संस्था ज्या वाक्तित्वानां पुरस्कारानं सन्मानीत करत असतो त्यांच्यां कार्याची माहिती हि प्रत्यक्षरित्या समाजमाध्यमात त्यांचा असणारां वावर,आणि त्यांच्या कार्याची महती,त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेत, त्यांच्या उत्तुंग कार्यांच्या लेखाजोखा स्वतः समाज्याच्या माध्यमातून घेऊन जनतेपर्यंत पोहचविण्याचं काम ह्या संस्था करत असतात म्हणूनच आज ह्या पुरस्कार वितरण सोहळ्यात … संपूर्ण रायगड जिल्ह्यातील …सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,कला,क्रीडा,वैज्ञानिक,संरक्षणविभाग,अश्या आपापल्या क्षेत्रात… उल्लेखनीय आणि अतुलनीय कामगिरी करणार्या …आठ रत्नांनां. आठ पुरस्कार विजेत्यांना .संस्थांच्या वतीनं… गुणवंत पुरस्कार…या सन्मानानं सन्मानीत करण्यात आलं.
सोबती संस्था पेण… आणि… बापूसाहेब नेने फाऊंडेशन पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या सुंदर कार्यक्रमा करीता प्रमुख उपस्थिती दर्शविली ती … हाऊस ऑफ़ कॉमर्स लंडन येथे… महात्मा गांधी संवाद पुरस्कार विजेते..जेष्ठ पत्रकार …सन्माननीय … श्री अमर जी वाडे साहेब सन्माननीय …श्री बापूसाहेब नेने अध्यक्ष :- बापूसाहेब नेने फाऊंडेशन पेण, श्री मंगेश जी नेने साहेब,…श्री प्रशांत जी आठवले सचिव :- बापूसाहेब नेने फाऊंडेशन पेण, श्री सचिन जी मदाने सहसचिव :- सोबती संस्था पेण , सोबतच ह्या कार्यक्रमा करीता विशेष हजेरी लावली ती …श्री सुनिल जी वर्तक अध्यक्ष :- गोवठणे विकास मंच ,श्री पंकज जी ठाकूर पत्रकार श्री अनिल जी घरत उरण तालुका सचिव :- आगरी,कोळी,कराडी संघर्ष सा. संस्था , श्री संपेश जी पाटील उपाध्यक्ष :- सारडे विकास मंच श्री रोशन जी पाटील खजिनदार :- सारडे विकास मंच …आणि सर्व पुरस्कार विजेते ,सोबती संस्था पेण आणि बापूसाहेब फाऊंडेशन पेण या संस्थांचे सर्व पदाधिकारी,सदस्य आणि महिला भगिनी आणि पत्रकार बंधूंच्यां उपस्थितीत शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा ..दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा… अगदी मोठ्या उत्सहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.
Leave a Reply