राजुर/प्रतिनिधी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, गणपती संस्थांन ,ग्रामपंचायत,व्यापारी व पोलीस प्रशासन यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संकष्टी चतुर्थीला जनता कर्फ्यु पाळून कडकडीत बंद ठेवला. परंतु लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता न आल्याने भक्तांचा हिरमोड झाला होता.त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला.पोलीसांनी जागोजागी बंदोबस्त वाढविल्याने राजुरेश्वराच्या पायरीवरही माथा टेकता आला नाही.भक्तांनी रोडवर उभे राहूनच श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून भाविक राजूर येथील श्रीमहागणपतीच्या दर्शनासाठी येतात. मंगळी चतुर्थीला रा भक्तांची प्रचंड गर्दी उसळते.भक्त आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाली की नवस फेडण्यासाठी राजुरेश्वराच्या दरबारी येतात. मनोभावे पूजा करून नवस फेडतात.परंतु यावेळी प्रशासनाने गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून जनता कर्फ्यु लागू केला होता. त्यामुळे भाविकांना राजुरेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन श्रीचे दर्शन घेता आले नाही. मंदिर बंद असल्याने भाविकांकडून जी खरेदी होत असते ती यावेळी झाली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.मंदिर चालू असल्यास भाविक राजुरेश्वराच्या चरणी फुले,फळे, हार, श्रीफळ, प्रसाद खरीदी करत असतात. त्यातूनच लहान व्यवसायास चालना मिळून अनेकांच्या हाताला काम मिळते. खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. परंतु या संकष्टीला मंदिर बंदमुळे त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसला.अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाऊ नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवला होता. फिरत्या पोलीस व्हॅनमधून वारंवार सूचना दिल्या जात होत्या.काही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष दिले होते.
आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेता न आल्याने भाविक मनोमनी नाराज झाले होते. त्यामुळे अनेक भक्तांनी रोडवर उभे राहून दर्शन घेणे पसंद केले.
Leave a Reply