जालना-प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कै. भोप्या वस्ताद भगत आखाडा आणि अखिलेश भजन मंडळ व इतर समाजाच्यावतीने राखी पोर्णिमेनिमित्त भुजरिया व दंडे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सावाची परंपरा फार पुरातन असून संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दंडे उत्सव नागपंचमीपासून सिंधी बाजार, फुलबाजार भागात या उत्सवाला सुरूवात झाली होतीे. यावर्षी कोरोनामुळे परिस्थिती बिकट आहे. परंतू मुळात दंडे खेळण्याचा उत्सव असून निर्धारीत अंतर राखूनच दंडे खेळले जाते, यालाच भुजरिया उत्सव म्हणतात.
महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे यांनी या उत्सावाची माहिती देतांना सांगितिले की, सर्व समाजातील लोक वेगवेगळी वेशभुषा करून दंडे खेळतात. अनेक शौकीन, प्रेमीजन हा उत्सव पाहण्यासाठी येतात. अहिर गवळी समाजात हा उत्सव साजरा केला जातो. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची आम्हाला जाण असून हा खेळ तर पहिल्यापासूनच सुरक्षित अंतर राखून खेळला जातो. आता विशेष करून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, प्रेक्षक मंडळी ठरावीक अंतर राखून हा उत्सव साजरा केला, अशी शेवटी सुनिल खरे यांनी सांगितिले.
तसेच हा उत्सवात यशस्वी करण्यासाठी किशोर भगत, कचरु भगत, अनिल भगत, अमरचंद भगत, घनश्याम खाकीवाले, मदन भगत, भागीरथ भगत, तिलक भगत, भरत भगत, नारायण भगत, जयचंद भुरेवाल, मेघराज भगत, अशोक भगत, राधाकिशन भगत, कन्हैय्या वस्ताद भगत, किसन वस्ताद भगत, सतपाल खाकीवाले, गणेश जटावाले, गोविंद गोमतीवाले, मनोज काबलीये, संदीप झाडीवाले, हरेश भगत, आकाश भगत, आदित्य भगत, राहुल भगत, शंकर भुरेवाले, कुंदन गोमतीवाले, भुषण नंद, वैभव दिपवाल, गजानन नारियलवाले, कैलास भगत, रुपेश भगत परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे आयोजक अखिलेश भजन मंडळ, जालना यांनी केले.
Leave a Reply