उरण (संगीता ढेरे) केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब यांच्या औदार्यातून साकारले गंध हे प्रेमाचे , गोड नात्यांचे भारतीय सण-संस्कृतीतून देशाच्या एकात्मतेचं दर्शन होतं असतं … हिंदू संस्कृतीत प्रत्येक सण-उत्सवामागे अध्यात्मासोबत एक विज्ञानाचं महत्व सुद्धा दडलेलं असतं
आजच्या दिवशी आगरी,कोळी,बांधव पारंपारिक पध्दतीनं नारळी पोर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण अगदी उत्सहात साजरा करतात आणि ह्याच. भावा- बहिणींच्या अतुट प्रेमाच्या आणि प्रेमळ नात्यांच्या सण हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद उधळत आणि सुख- समृद्धी घेऊन यावा ह्याच भावनेतून केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री राजू मुंबईकर साहेब यांच्या औदार्यातून रानसई येथील खोंड्याची वाडी या आदिवासी वाडीवरील आदिवासी बालगोपाळानां आणि माय -भगिनींना ह्या सणाचा आनंद साजरा करता यावा म्हणून श्री राजू मुंबईकर यांनी त्या बालगोपाळांकरीता आकर्षक राख्या खरेदी करून त्यांच वाटप करण्यात आलं सोबतच त्या भावा- बहिणींनां ह्या सणांच्या निमित्ताने कुछ मीठा हो जाये .म्हणून चॉकलेट आणि बिस्किटं सुद्धा वाटप करण्यात आली.. त्या राख्या वाडीवरील चिमुकल्या भावांच्यां हाताला बांधत बहिणींनी रक्षाबंधन सण साजरा केला सोबतच वाडीवरील माय- भगिनींनीं त्यांच्या हक्काच्या भावाला अर्थात श्री राजू मुंबईकर साहेब ( राजू दादा ) यांना आणि त्यांच्या सोबतच्या सर्व सहकारी बंधूंना आपुलकीनं राख्या बंधात आपल्या भावा – बहिणींच्या नात्यांतील वीण घट्ट केले !
ह्या आपुलकीनं भारावलेल्या सुंदर अश्या सोहळ्यात त्या वाडीवस्तीवरच्या चिमुकल्या बाळगोपाळांच्यां हातावर जेव्हा राख्या बांधल्या जात होत्या तेव्हा त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता त्यातच त्यांना ह्या सणांच्या दिवशी मिळालेलं गोड – धोड सर्वांच्या मनाला आनंद देणारा क्षण होता.
केअर ऑफ़ नेचर सा.संस्थेचे संस्थापक श्री राजू मुंबईकर साहेब. यांच्या औदार्यातून साकारलेल्या ह्या आनंददायी सोहळ्यास उपस्थिती दर्शवून सहकार्य केलं ते सारडे विकास मंचचे उपाध्यक्ष श्री संपेश जी पाटील, खजिनदार श्री रोशन जी पाटील ,श्री कांतीलाल जी म्हात्रे गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री नवनीत जी पाटील, श्री अनिल जी घरत. आणि रानसई आदिवासी वाडीवरील सर्व आदिवासी बांधव, माय – भगिनी, चिमुकल्या बाळगोपाळांच्यां उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात हा सुंदर सोहळा सम्पन्न झाला.
Leave a Reply