आली पौर्णिमा श्रावणी
भरती आली समुद्राला.
लाटा उसळती प्रेमाने
आले उधाण आनंदाला.
कुमकुम तिलकाचा टिळा
धागा राखीचा बांधते.
दोन नेत्रांच्या दिपाने
औक्षवण बंधूचे करते.
इडा पिडा टळो सारी
नांदो समृध्दी जीवनी.
नको साडी चोळी भावा
प्रेम नांदो अंतःकरणी.
बहीण भावाच्या नात्याला
येते भरते प्रेमाचे.
भाऊराया बहिणीला
देतो वचन रक्षेचे.
धागा नाजूक रेशमी
नाते अतूट अतूट.
झाले जरी मतभेद
प्रेम अंतरी अमीट.
बहिणीच्या हृदयात
रूप वसे माऊलीचे .
नसे आशा संपत्तीची
जाण मोल या प्रेमाचे.
श्रीमती अनिता पवार.
जालना.
9765665106
Leave a Reply