मुरूड जंजिरा (सौ नैनिता कर्णिक) मुरूड जंजिरा येथील तनिष्का सदस्यांचा रक्षासूत्र रक्षाबंधन कार्यक्रम मुरूड समन्वयक सन्माननीय सौ नेहा पाके यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला. प्रथम सौ नेहा पाके मॅडम यांनी उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले.प्रास्ताविकात तनिष्का अभियान व येणाऱ्या समस्यांचे निराकरण कसे केले उदा: गॅस सिलिंडर पाणी पुरवठा या समस्या कशा सोडविल्या तसेच अभिषेक भोसले यांनी उद्योगांच्या विकासासाठी केलेले मार्गदर्शन या विषयी प्रतिप्रादन केले.
रक्षासूत्र रक्षाबंधन कार्यक्रमास मा. सौ मुग्धा दांडेकर नचिकेत हायस्कूल चेअरमन,सौ उषा खोत सेवानिवृत्त मुख्याध्यापिका,सौ नैनिता कर्णिक सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा पत्रकार , तसेच सौ मीना तांबटकर,सौ अनिता तांबटकर, सौ प्रमिला तांबटकर,सौ वनिता गुंड,(तेलवडे)सौ प्रज्ञा तळकर,सौ प्रमिला पाटील,सौ वनिता जामकर, सौ नंदा वाघरे,सौ हीरा पाटील,सौ सोनल पाके,तन्वी पाटील (एकदरा)या सर्व तनिष्का सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.सगळ्या महिलांनी एकमेकींच्या हातात रक्षासूत्र बांधले. सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मान.श्री अभिजीत पवार यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले. राखीचा रेशीम धागा आपल्या सर्वांना पुढल्या दिशेकडे, समाजहिताच्या
स्वप्नपूर्तीकडे गुंफनारा नेणारा ठरावा. अशा सर्व तनिष्का सदस्यांनी शुभेच्छा दिल्या. सौ नैनिता कर्णिक यांनी मानअध्यक्षा सौ पाके मॅडम मा. मुग्धा दांडेकर नचिकेत हायस्कूल चेअरमन , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ उषा खोत मॅडम व उपस्थित असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ नेहा पाके मॅडम यांच्या मोलाच्या सहकार्यातून रक्षासूत्र रक्षाबंधन कार्यक्रम झाला याबद्दल धन्यवाद दिले.व कार्यक्रमाची सांगता केली.
Leave a Reply