नांदेड – शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात माता रमाई भिमराव आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक गयाताई कोकरे, बी. एस. गोडबोले, राहुल कोकरे, संजय कदम, प्रसिद्ध गायक क्रांतीकुमार पंडित हे उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली. शोभाबाई गोडबोले, निर्मलाबाई पंडित, चौत्राबाई चींतूरे शिल्पाताई लोखंडे, आशाबाई हटकर, सुनीता हिंगोले, जिजाबाई खाडे, गयाबाई नरवाडे, छायाबाई थोरात, ज्येष्ठ नागरिक जळबाजी थोरात, लखन नरवडे, अनिल निखाते, गौरव पंडित, संघपाल गोडबोले यांच्यासह बालक बालिका बहुसंख्येने महिला पुरुष नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
Leave a Reply