जशी माझ्या भिमाची लेखनी होती
त्याहून साहेबांची रमा देखणी होती
सुभेदार रामजी सकपाळची ती सून
साहेबांचा आयुष्याची आखणी होती
दुःख,कष्ट सहन करणारी माता रमा
साहेबांचा पुस्तकांची मांडणी होती
कोळसे विकायची गोवऱ्या थापायची
साहेबांचा विचाराची रक्तवाहिनी होती
ठिगळाच लुगडं नेसणारी माता रमा
साहेबांच्या संसारची ती दामिनी होती
रड रडायची साहेबांची वाट पहायची
साहेबांच्या दुःखाची अर्धी वाटणी होती
साहेबांचा अतोनात कष्टाला पाहून रमा
साहेबांचा शिळ्या भाकरीची चटणी होती
✍️राजू गायकवाड(#कविराज)
THE KING OF HEARTS
9604891674
अनिल गायकवाड -
खूप छान अप्रतिम काव्य