ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अहमदनगर जिल्ह्यातील रणरागिणी, जिजाऊंची लेकअनिताताई काळे यांना राष्ट्रीय नवदुर्गा पुरस्काराने मुंबई मध्ये गौरविण्यात आले

October 25, 202115:33 PM 71 0 0

मुंबई- संजीवन कला विकास प्रतिष्ठान आयोजित गाथा शौर्याची नवदुर्गा/शौर्य पुरस्कार सोहळा २०२१ दि. २० आॅक्टोबर बुधवार सायंकाळी सात वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ दुसरा मजला सीएसटी येथे संपन्न झाला. राज्यस्तरीय सन्मान संख्येमध्ये श्रीम. सुनीताताई शिंदे(उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य रा. कां. पक्ष) श्री देवेंद्र भुजबळ मा. माहिती संचालक, श्री नरेंद्र वाबळे अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ, मा. प्रेमा किरण ज्येष्ठ अभिनेत्री, नयन पवार, सिने-नाटय अभिनेत्री, डाॅ वाजासुप्रसिध्द, समाज सेवक प्रतिभा बागवे साहित्यिका विचारवंत व जिजाऊ व्याख्याता, विभागीय संघटक जिजाऊ ब्रिगेड मा. शिवमती अनिताताई काळे, श्री विनोद सावंत, शालिनीताई गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी संस्थेच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून उदयोग-व्यवसाय पर्यावरण शिक्षण कीर्तन कला संस्कृती सामाजिक सौंदर्य आरोग्य वैद्यकीय क्षेत्रातील इ. ५७ जणांना पुरस्कार देऊन त्यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरविण्यात आले, संस्थेचे सहसचिव श्री एन डी खान यांनी प्रास्ताविक केले तर संस्थेच्या सचिव वाईस क्वीन पूर्णिमा शिंदे यांनी आपल्या सुमधुर आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सदर कार्यक्रमास सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचे गौरवोद्गार काढले. संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून पुरस्कारराठी आलेल्या व्यक्तींचे त्यांच्या यशाचे कौतुक या सोहळ्यात करण्यात आले. तद प्रसंगी श्री सुशांत शिंदे, श्री लक्ष्मण चव्हाण, आदित्य गायकर या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *