ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी रणजित गोणारकर यांची निवड

March 13, 202112:28 PM 36 0 0

नांदेड- येथील सप्तरंगी बहूउद्धेशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र शाखा नांदेडच्या जिल्हाध्यक्षपदी साहित्य चळवळीत अग्रेसर असलेले तथा पत्रकार रणजित गोणारकर यांची तर स्तंभलेखिका रुपाली वैद्य वागरे यांची राज्य कार्यकारिणीवर महिला समन्वयक म्हणून निवड करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे महासचिव पांडुरंग कोकुलवार यांनी दिली. ही निवड करण्याचा निर्णय नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

संत सेना महाराज जयंतीचे औचित्य साधून जीवा सेना आणि अखिल भारतीय जीवा सेना कर्मचारी महासंघाच्या व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित कौठा येथील सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात गोविंद बामणे – उपाध्यक्ष, लक्ष्मण लिंगापुरे – सचिव, भीमराव ढगारे- कोषाध्यक्ष, दिगंबर श्रीकंठे, रविराज भद्रे – कार्यकारिणी सदस्य अशी निवड करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, सहसचिव कैलास धुतराज, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गाजेवाड यांची तर प्रमुख उपस्थिती म्हणून जीवा सेना महासंघाचे प्रदेक्षाध्यक्ष लक्ष्मण कोंडवार, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल गायकवाड, महानगर अध्यक्ष बाळासाहेब पवार, पिछडा शोषित संघाचे उपाध्यक्ष सतीशचंद्र शिंदे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *