ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रानसई ग्रामपंचायत ने पावसात वाहून गेलेला रस्ता दुरुस्त केला .

July 26, 202120:20 PM 11 0 0

उरण  प्रतींनिधी (संगीता ढेरे ) गेल्या आठवड्यात मुसळधार पावसात उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हददीतील
रस्ता व त्या लगत असलेल्या मोऱ्या वाहून गेल्या त्यामुळे या रात्यावरून जाणाऱ्यानागरिकांचे हाल होत होते त्याचे गांभीर्य लक्षात घेता रानसई ग्रामपंचायतीने सदर चा रस्ता अर्जंट दुरुस्त केला नागरिक धन्यवाद देत आहेत .


रस्ता वाहून गेल्याने मारगाची वाडी ,बंगल्याची वाडी खोंड्याची वाडी सागाची वाडी भु-याची वाडी खैरकाटीया वाडीतून आदिवासी रानसई ते पनवेल या मार्गाने भाजीपाला विकावया पनवेल येथे जातात रस्ता खराब झाल्याने तीन दिवस रस्ता बंद होता .त्यामुळे आदिवासी पनवेल येथे भाजीपाला विकावयास जाऊ शकले नाही हि नागरिकांचे समस्या लक्षात घेता रानसई ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घातले गुरुवार (दि. २२ ) व शुक्रवार (दि. २३ ) व शनिवार तीन दिवस जे सी बी लाऊन माती व दगड टाकून रस्ता दुरुस्त केला .नागरिकांची समस्या दूर केली .त्यामुळे नागरिकांनी रानसई ग्रामपंचायत सदश्यांचे आभार मानले .
रस्ता दुरुस्त करतांना रानसई ग्रामपंचायत सरपंच गीता भगत ,उप सरपंच सुरेश पारधी, , ग्रामपंचायत सदस्य प्रदीप खैरे,शंवता पारधी ,नर्मदा दोरे, गुरूनाथ वीर. शानिबाई भस्मा ,राधा दोरे ,तसेच ,नारायण बरतोड, रानसई भाजपा अध्यक्ष शाम लेंडे,, रमेश दोरे , धर्मा पारधी ,बाळाराम चौधरी ,धनराज कवटे ,ग्रामसेवक व्ही .आर म्हात्रे , अशोक कवटे रमेश भला ,, सुनील शिंगवा ,,विजय शिंगवा अनिल भगत , आदी उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *