जालना : बदनापूर तालुक्यातील देवगावात माणुसकीच्या नात्याला कालिमा फासणारी दुर्दवी घटना घडली आहे. एका नराधमाणे घरासमोर कोंबड्याना दाणे टाकत असलेल्या 12 वर्षीय मुलीला घरात फरफडत घेऊन जात. तिच्यावर विवस्त्र होऊन लेंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारी वरून बदनापूर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अत्याचारानंतर आरोपी फरार असून, या प्रकरणी पोलिस आरोपीच्या शोध घेत आहे. मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ जालना जिल्ह्यत बलात्काराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
नागरिकांकडून या धक्कादायक घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यात सोमवारी एकाच दिवशी बलात्काराचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात 9, 13 आणि 21 वर्षीय मुलींवर बलात्कार झाला आहे. एकाच दिवशी 3 अत्याचाराच्या घटना समोर आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनांनी शहरात मुली, महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Leave a Reply