खारघरमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये एका तरुणीवर दोघांनी बलात्कार केला. तीन फेब्रुवारीला ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात दोन आरोपींपैकी एक तरुणीचा मित्र आहे. खारघर मुंबईच्या जवळ आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दुसऱ्याचा शोध सुरु आहे. आरोपी आणि पीडित तरुणी खारघरमध्ये एकाच इमारतीत राहतात असे पोलिसांनी सांगितले. आरोपींपैकी एक वाहन चालक आहे तर दुसरा पिझा डिलिव्हरीचे काम करतो. तीन फेब्रुवारीला मुख्य आरोपीने मला बाईकवरुन फिरवून आणण्याचे व भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने जवळच्या मद्याच्या दुकानातून मद्याची बाटली विकत घेतली व रात्री दहाच्या सुमारास मला खारघरमधील उत्कर्ष हॉलजवळ पार्क केलेल्या बसमध्ये घेऊन गेला, असे पीडित तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
इच्छा नसतानाही आरोपीने मद्य पिण्यासाठी माझ्यावर जबरदस्ती केली असे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले. पीडित तरुणीला मद्याची नशा चढल्यानंतर आरोपीने तिचा फायदा घेत बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राला तिथे बोलावले. त्याने सुद्धा परिस्थितीचा फायदा घेतला. दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीला तसेच बसमध्ये सोडले व तिथून निघून गेले. पीडित तरुणी शुद्धी आल्यानंतर रिक्षा पकडून घरी गेली व दुसऱ्या दिवशी घरच्यांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी नंतर खारघर पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार नोंदवली.
Leave a Reply