ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 2 कोटी 36 लाखांचा निधी धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द

September 10, 202115:14 PM 4 0 0

सातारा(विदया निकाळजे) : रयत शिक्षण संस्थेकडून कोविड-१९ साठी मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द मुंबई, दि. 9: रयत शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19) साठी 2 कोटी 36 लाख 84 हजार 757 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी वर्षा निवासस्थान येथे सुपूर्द केला.

यावेळी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या राज्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी या निधीसाठी एक दिवसाचे वेतनाचे योगदान दिले आहे. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्यात आला आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *