नांदेड – शहरातील देगाव चाळ येथील प्रज्ञा करुणा बुद्ध विहारात येथे शनिवारला आषाढ पौर्णिमेपासून धम्मपद गाथा व कथांच्या वाचनास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विहाराचे व्यवस्थापक सुभाष लोखंडे यांनी दिली.
आषाढ पौर्णिमेपासून बौद्ध भिक्खू वर्षावासाला प्रारंभ करतात. तद्वतच ठिकठिकाणी उपासक उपासिका हे आपल्या नजीकच्या विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करतात. देगाव चाळीत उपासिका शोभाबाई सोपानराव गोडबोले यांच्या वतीने खीर दान ग्रंथ वाचन सुरुवात करण्यात येत आहे. धम्मपद गाथा व कथा या सात खंडाचे वाचन सलग तीन महीने उपासक राहुल कोकरे हे करणार आहेत.
या खीरदान तसेच ग्रंथ वाचन कार्यक्रम प्रज्ञा करुणा विहारावरून फेस बुक व युट्युब चॅनलवर लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. दोन तास आगोदर लिंक पाठविण्यात येईल व देगाव चाळ रहिवासी ग्रुपच्या वतीने देणगी देण्यात आली आहे, त्यासंबंधी जमा खर्च सादर करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजता सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रंथ वाचन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, सुभाष लोखंडे वतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply